पाणी बचतीनंतर सेंद्रिय शेतीचा कारभार | Orgainic Farming | Farmer | Drip plan |Sakal Media |

2021-04-28 1

कोल्हापूर : बदलत्या वातावरणाला सामोरे जात कारभारवाडी (ता. करवीर) येथील शिवा रामा पाटील पाणीपुरवठा संस्थेच्या चारशे शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे एकशे दोन एकर शेती सुजलाम-सुफलाम केली आहे. ठिबकच्या पाण्याने शेती फुलवत 50 टक्के शेतकऱ्यांची आता आरोग्यदायी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल सुरू आहे.
कोल्हापूरपासून 17 किलोमीटरवर असलेले कारभारवाडी हे जेमतेम 450 लोकवस्तीचे गाव. सडोली खालसा ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील छोटीशी ही वाडीच. 60 कुटुंबांचे वास्तव्य या वाडीत असून, शिवा रामा पाटील पाणीपुरवठा संस्थेच्या पुढाकाराने गावातील संपूर्ण शेती ठिबक योजना आकाराला आली. ती संगगणकीकृत आहे. गावच्या विकासाच्या आड येणारे राजकारणातील गट-तट बाजूला ठेवून या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन "गाव करील ते राव काय करील' या म्हणीची प्रचिती आणून दिली आहे. गावातील 60 कुटुंबांची मिळून 130 एकर जमीन आहे. यापैकी एकशे दोन एकर जमीन एकाचवेळी ठिबकखाली आणून पाणी बचतीबरोबरच शेतीची सुपीकता वाढवण्याचा संदेशही गावकऱ्यांनी दिला आहे.
शाश्‍वत शेती, जमिनीची सुपीकता त्यातून पाण्याची बचत करणे ही आव्हाने सध्या शेतीसमोर आहेत. भावी पिढीला जमिनीची प्रत चांगली व कसदार देण्याची जबाबदारी आताच्या पिढीवर आहे. त्याशिवाय यापुढे पाणी बचतीशिवाय पर्याय नाही, या जाणीवेतून गावाने हा पुढाकार घेतला आहे.
#orgainicfarming #farmer #Dripplan #Kolhapur
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires